Step into an infinite world of stories
जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर सार्या जगाचा कायापालट करणारी विलक्षण, प्रचंड विध्वंसक घटना कोणती असेल तर ती आहे दुसरे महाविनाशक महायुद्ध. सारा युरोप आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर गदागदा हलवून सोडायचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेने बेभान झालेल्या हिटलरने वॉर्साच्या रोखाने आपले सैन्य धाडताच, त्याच्या या उद्याम आवेगाला आवर घालण्याचा निर्धाराने ३ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्धाचा पुकारा केला आणि तेव्हापासून दुसर्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि बरोबर सहा वर्षांनी म्हणजे २ सप्टेंबर १९४५ रोजी या रणयज्ञाची सांगता झाली. या महायुद्धात सत्तावन्न देशांनी भाग घेतला त्यापैकी जर्मनी, ब्रिटन आणि रशिया या तीन राष्ट्रांची अपरिमित हानी झाली विनाशाचे एवढे भीषण तांडव जगाने यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते. एवढे प्रदीर्घ आणि प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली. वॉर्साच्या रोखाने हिटलरची घोडदौड सुरू होताच या कहाणीचे पहिले पान लिहिले गेले तीन कोटी माणसांच्या रक्ताने. या कहाणीची मधली सारी पाने भिजून गेली आणि तिचे भरतवाक्य छातीवर अणुबॉंब झेलणार्या हिरोशिमाने उच्चारले. जगाला न ओळखण्याइतके बदलून टाकणार्या या महाभयानक घनघोर रणसंग्रामाचा चित्रदर्शी शब्दपट म्हणजे "वाँर्सा ते हिरोशिमा "
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353815714
Release date
Audiobook: 2 September 2021
English
India