Step into an infinite world of stories
८ मे १९४५ या दिवशी म्हणजे ५ वर्षे, ८ महिने व ७ दिवसांनंतर दुसरे महायुद्ध संपले. तिसरे राईश गडपच झाले.जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला नाही. लक्षावधी सैनिक व सर्वसामान्य नागरिक बेघर झाले. अन्न नव्हते, निवारा नव्हता, सर्वत्र पडलेली घरं होती. चिंध्या पांघरून अर्धपोटी अवस्थेत पुढचा हिवाळा जनतेला काकडत काढवा लागणार होता. पुढे फक्त अंधार होता, भीषण अंधार. मृत्यू-दरीसारखा. तिसरे राईश इतिहासजमा झाले होते. या नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातलं यश नेहमीच डागाळलेलं का असतं? युद्धाने प्रश्न सुटतात का? या नि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणारी, वि. ग. कानिटकरलिखित मराठी कादंबरी - 'नाझी भस्मासुराचा उदयास्त', ऐका राहुल सोलापूरकर यांच्या आवाजात.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354346798
Release date
Audiobook: 22 September 2021
English
India