Step into an infinite world of stories
वयात आलेल्या मुलीनं चुकीच्या मुलाचा हात धरू नये या धसक्यानं अंबर कारखानीस आपली मुलगी इशिका हिचं तडकाफडकी लग्न लावून द्यायचा निर्णय घेतात. इशिका हुशार आणि अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. तिला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. मात्र वडिलांच्या हट्टापुढे तिचा नाईलाज आहे. इंद्रनील सरपोतदार या राजबिंड्या आणि शिस्तबद्ध तरुणाशी ती लग्नाच्या बेडीत अडकते. इशिकानं काहीशा नाराजीनंच सुरू केलेल्या वैवाहिक जीवनाच्या या प्रवासात हळूहळू प्रेमाचा अंकूर फुलतो, पण तेवढ्यात इंद्रनील आणि इशिकाच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागतं आणि त्यांची ताटातूट होते. काय असतं या दुराव्याचं कारण, इशिका कशी करेल आपली स्वप्नं पूर्ण, ऐका एक भावस्पर्शी, गुंतवून ठेवणारी प्रेमकथा, ‘प्रीत बहरताना’ फक्त प्रतिलिपी एफएमवर!
© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767071
Release date
Audiobook: 5 August 2023
English
India