Step into an infinite world of stories
आदिती आणि चिराग अगदी बेस्ट फ्रेंड्स… आदितीच्या भाषेत अगदी Made for each other पण only as friends! आदितीला कुठलाही प्रॉब्लेम आला की चिरागची आठवण येते… चिराग तर आदितीच्या मेसेज शिवाय डोळेच उघडत नाही. दोघांच्या मैत्रीत इतका मोकळपणा की अगदी डेटिंग ऍपवरच्या मुलाला कुठे भेटू हे विचारायलासुद्धा आदितीला चिराग लागतो. चिराग कधी कशामुळे चिडला असेल आणि त्यातून त्याला कसं मनवायचं हेही तिला आपोआप कळतं. एकमेकांवाचून ते जगूच शकत नाहीत. पण मग, खरंच हे इतके compatible असताना आदिती चिरागला सोडून dating app वरुन मुलं का शोधतीये? आणि आदितीला जसा चिराग फक्त ‘as a friend’ हवाय तसंच चिरागचं नक्की अहे नं? या गोष्टीत त्या दोघांमधली मैत्री पावसाच्या साथीने घट्ट तर होत जाते, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाईल का?
Release date
Audiobook: 14 November 2021
Ebook: 14 November 2021
English
India