Step into an infinite world of stories
5
Biographies
मंदार वाडेकर यांचे ‘जावे त्या देशा’ हे पुस्तक म्हणजे केवळ त्यांनी केलेल्या पर्यटनाचे वर्णन नसून त्यांच्या जीवनाचा प्रवास आहे. सावंतवाडीचा निसर्ग, सांगलीतील साहित्य, मुंबईची गतिशीलता, दुबईची समृद्धी, सिंगापूरची शिस्तबद्धता या सर्व पैलूंचा एकत्रित परिणाम त्यांच्या लेखनात स्पष्ट दिसतो. ‘जावे त्या देशा’ हे पुस्तक म्हणजे फक्त विविध शहरांच्या आणि देशांच्या संस्कृतीची ओळख नसून एका व्यक्तीच्या बदलत्या जीवनदृष्टीची कथा आहे ज्याची परिणीती पुढे त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात होते.मंदार वाडेकर यांचा अमेरिकेतील प्रवास आणि वास्तव्य हे एका मोठ्या शोधयात्रेचा भाग आहे. पिट्सबर्गपासून लॉस एंजलस आणि तिथून टेक्सासपर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ भौगोलिक प्रवास नाही; तर एका खंडप्राय, समृद्ध देशाच्या विविधतेची, इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून देणारा हा प्रवास आहे.‘जावे त्या देशा’ हे प्रवासवर्णन इतर प्रवासवर्णनांपासून वेगळं आहे कारण ह्या पुस्तकात केवळ लेखकाच्या प्रवासाचे वर्णन नसून प्रवासातील अनुभवांमुळे लेखकाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कसा बदल होत गेला, त्याचा जीवनप्रवास कसा समृद्ध होत गेला हे स्पष्टपणे दिसतं. विविध ठिकाणी, विविध संस्कृतींमध्ये वास्तव्य करताना तिथल्या लोकांशी लेखकाने जोडलेली नाती त्याच्या कुटुंबाची व्याप्ती अधिकाधिक विशाल करत गेलेली आहे. ‘हे विश्वची माझे घर’ ही नुसती कविकल्पना नसून खऱ्या आयुष्यातही हे घडू शकतं याचं हे पुस्तक उत्तम उदाहरण आहे.
© 2025 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364387545
Release date
Audiobook: 24 February 2025
English
India