Step into an infinite world of stories
हिंदूपदपादशाही या ग्रंथाच्या प्रथम खंडात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर हिंदवी स्वराज्याचे नविन युग सुरू झाले व त्यानंतरचा हिंदूपदपादशाहीचा इतिहास मांडला आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्याचा प्रभाव संपूर्ण राष्ट्रात पसरला व त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी राजहुतात्म्याचा प्रतिशोध घेतला व थोरले बाजीराव रंगभूमीवर आल्यानंतर दिल्लीवर चाल करून संपूर्ण भारत देश मराठ्यांनी पादाक्रांत केला. नादीरशहा आणि बाजीराव, नानासाहेब आणि सदाशिवरावभाऊ आदी पेशव्यांच्या पराक्रमाची कथा सांगून हिंदूपदपादशाही कशी निर्माण झाली. यानंतर पानिपतच्या लढाया ,जेत्यांना जिंकणारा पराभव, सद्गुणी माधवराव व नंतरचा पानिपतचा प्रतिशोध व इंग्रजांना नमविले पर्यंतचा इतिहास त्यांनी मांडला आहे. या संपूर्ण इतिहासातून हिंदूंना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळते.
Release date
Audiobook: 24 November 2024
Tags
English
India