Step into an infinite world of stories
Religion & Spirituality
हिंदुत्वाचे पंचप्राण या ग्रंथात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत वर्षात जन्म घेण्याचा भाग्याचा उहापोह केला आहे. दुर्लभं भारतं जन्म मानुष्यं तंत्र दुर्लभम्... असं म्हणून ते या पुस्तकात लिहितात की दुर्देवीआणि दरिद्री हिंदुस्थान! हे शब्द कानी पडताच माझ्या मनात विचारांचा काहूर उसळला. या वरिल शब्दात किती तथ्य आहे हे मी पाहू लागलो. सांपत्तिक, सामाजिक, राजकीय वगैरे कोणत्याही दृष्टिने पाहिले तरी प्रस्तुतकाली हिंदु घोडे हे सर्व जगाच्या शर्यतीत पाठीमागे पडले आहे. त्याच्यावर वाटेल त्याने सत्ता सांगावी आणि लगाम घालून स्वारी भिडवावी. कोणास लढाईच्या खर्चाचे ओझे पेलनासे झाले की त्याने खुशाल ते त्या बिगारी घोड्यावर लादावे. आपल्या पाठीवर त्या परिकियांची ही अवघड ओझी लादून घेण्याबद्दल या घोड्यास प्राप्ती काय विचाराल तर पाठीवर बसणारे पारतंत्र्यांच्या प्रतोदाचे फटके ! अशा स्थितीमध्ये सापडलेल्या या घोड्यास कोणी दुर्देवी म्हटल तर त्यात काय चुकले? या घोड्याची अशी नित्कृ्ष्ट स्थिती त्याचे दुर्देवानेच केली असली पाहिजे. इतके मला वाटते आहे तोच पुन्हा माझे मनात विचार आला की , जर या घोड्याचा खरा नि नैसर्गिक धनी हे हिंदु लोक आपले नामर्दपण झाकण्यासाठी त्या घोड्यासच 'तूच दुर्देैवी' म्हणून म्हणण्यास यत्किंचितही कचरत नाहीत किंवा आपल्या दुर्गुणांचे खापर दुस-याचे माथी फोडणे हा अधोगतीकडे घसरलेल्या मनुष्यांचा धर्मच होय. सारांश हे घोडे दुर्दैवी नसुन धनी दुर्दैवी आहे!
Release date
Audiobook: 24 November 2024
English
India