Step into an infinite world of stories
Religion & Spirituality
तेजस्वी तारे या ग्रंथात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या देशातील आणि प्रामुख्याने विदेशातील क्रांतीकार्याची माहिती दिली आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी शेकडो तरूणांनी क्रांतीकार्यात उडी घेतली आणि सशस्त्र क्रांती केली. अनेकांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. हसत हसत ते देशासाठी फाशी चढले. यापैकी अनेकांच्या क्रांतीगाथा अज्ञान राहिल्या. हिंदी क्रांतीकारकांनी शिक्षणाच्या निमित्ताने ब्रिटनमध्ये, युरोपमध्ये जाऊन प्रत्यक्षात क्रांतीकार्यात सहभाग घेतला. अभिनव भारत चळवळीत अनेक जणा सहभागी झाले. इंग्लड, फ्रान्स, जर्मनी, चीन, रशिया अशा अनेक देशातील तरूण मोठ्या संख्येने स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. या सर्व तेजस्वी ता-यांची लखलखती कहाणी या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळते. यामध्ये क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा, मॅडम कामा, हिंदुस्थान गदर पक्ष, रशिया, चीन मधील कम्युनिस्ट क्रांतीकारक व त्यांची कार्ये तसेच महायुध्दाला इष्टापत्ती मानून ब्रिटीश सरकार उलथवून टाकण्यासाठी हिंदूस्थानी निर्वासीत क्रांतीकारकांनी केलेल्या सर्व कार्याचा उहापोह या ग्रंथात आहे.
Release date
Audiobook: 25 November 2024
English
India