Step into an infinite world of stories
1
Religion & Spirituality
हिंदूपदपादशाही द्वितीय खंडात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी स्वातंत्र्याच्या इतिहास कितीही दैद्यपीमान असला तरी तो प्रत्यक्ष हिंदू राष्ट्राच्या हिंदूस्थानाच्या इतिहासाचा एक भाग आहे त्यामुळे अखिल हिंदूजातीय हितसंबंधांच्या दृष्टिने महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासाचे महत्व उत्तम रितीने अजमावणे हा या लेखनाचा उद्देश आहे. ह्या उत्तरभागात मराठ्यांचा इतिहास केवळ फ्कत महाराष्ट्राचा रहात नाही तर त्याचे स्वरूप संकुचित न राहता त्याची व्याप्ती हिंदुस्थानभर वाढून प्रामुख्याने तो प्रत्यक्ष अखिल हिंदुस्थानचाच इतिहास गणला जावा इतके विशाल स्वरूप त्याला प्राप्त होते.आपल्या हिंदू लोकांपैकी दुस-या एखाद्या प्रांताने पहिल्याने या संग्रामात उडी घेतली असती आणि एवढी प्रचंड सिध्दी मिळवली असती मग महाराष्ट्राला आपल्यापुढे नतशीर्ष होण्यासाठी आव्हान दिले असते तर ते अखिल हिंदूजातीय दृष्टिने त्यांचे ते करणे निःसंशय समर्थनीय झाले असते. स्थापन करावयची हिंदूपदपादशाही रजपुतांची किंवा शिखांची किंवा तामिळांची किंवा बंगाल्यांची किंवा अगदी कोलारची पादशाही साम्राज्य व्हावयाचे होते हे महत्वाचे नव्हते तर ह्यापैकी कोणीही आपल्यापैकी सर्वांना एकत्र आणून हिंदूसाम्राज्य बनवून हिंदूमात्राच्या कार्याचा इतक्या उत्तम रितीने अग्रीम पुरस्कार केला असता तोपर्यंत त्यांनी हे साम्राज्य आपल्याच प्रांतांच्या नियंत्रणाखाली ठेवले असते तरी ते आपल्या तितक्याच आदराला आणि कृतज्ञतेला प्राप्त झाले असते.
Release date
Audiobook: 24 November 2024
English
India