Step into an infinite world of stories
4.6
Religion & Spirituality
सत्य सांगायचे तर ही एका अशा संन्याशाची कथा आहे ज्याने खूप कमी वयातच कोट्यावधीची संपत्ती कमावली आणि नंतर तो संन्यासी बनला. वयाच्या १८ व्या वर्षी ऑस्ट्रेलियात जाऊन लाखो डॉलर्स मिळवणा-या या युवकाला सुरूवातीला भौतिक संपन्नता मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. पण अनेक वर्षे ऐषोरामात घालवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आंतरिक अस्वस्थतेकडं दूर्लक्ष करणे शक्य नाही. अखेर तो भारतात परत आला आणि ज्यासाठी तो तळमळत होता त्या आंतरिक समाधानासाठी त्याने संसाराचा परित्याग करू न तो संन्यासी बनला. हिमालयाच्या भयावह एकांतात आणि शांततेत त्याने कठोर साधना केली. उपासमार, जंगली श्वापदांपासून असणारी भिती यांच्याशी सामना करताना मृत्यू सदैव त्यांच्या भोवती वावरत होता. सरतेशेवटी त्यांची साधना सफल झाली. आजकालच्या संभ्रमावस्थेच्या काळात अध्यात्मिक जीवनाची जडणघडण कशी होऊ शकते याची ओम स्वामी यांची ही साक्षात्कारी कहाणी...!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353816513
Release date
Audiobook: 22 April 2022
English
India