Step into an infinite world of stories
5
Religion & Spirituality
या पुस्तकाद्वारे आपण मृत्यूविषयीचं सत्य, त्याचबरोबर मृत्यू पूर्णविराम नसून अल्पविराम आहे हेही जाणणार आहात. हे ज्ञान आपल्या वर्तमानात बदल घडवून आणेल आणि जीवनाला सुंदर, सकारात्मक बनवेल. शिवाय प्रत्येक प्रकारच्या भयापासून मुक्त करेल आणि आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून जीवनाचा कायापालट करेल.
जीवनात अनेक कठीण घटना, अडचणींना सामोरं गेल्यानंतरच लोकांना समजतं, की त्या दुःखद घटनांमुळे ते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत, कणखर बनले आहेत. हे रहस्य ‘पृथ्वीलक्ष्य’ या पुस्तकाद्वारे ज्ञात होईल.
हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या जीवनातील कोणताही पैलू अज्ञात राहणार नाही. जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त तर व्हालच त्याचबरोबर मोक्ष, महाजीवनही प्राप्त कराल. ‘पृथ्वीलक्ष्य’ या पुस्तकाद्वारे आपलं जीवन सार्थकी लावा. त्याचप्रमाणे इतरांचं जीवनही अधिक सुखकर होण्यासाठी आपण निमित्त बना. जीवनाचं महान रहस्य जाणून सर्व इच्छा-आकांक्षांपासून एवढंच नव्हे तर मृत्यूपासूनही मुक्त व्हा.
Release date
Audiobook: 27 May 2021
English
India