Step into an infinite world of stories
4.7
Non-Fiction
मानसशास्त्र' हा सध्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय होत आहे. पण त्या कुतूहलापलीकडे यामध्ये एक शहाणपण असते, हे समजणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा देशपांडे यांच्या 'मानसिक प्रथमोपचार' या पुस्तकातून आपल्याला ते जाणवते. * मानसिक प्रथमोपचाराचे स्वतंत्र विज्ञान आहे आणि ती एक कलाही आहे. समुपदेशक डॉ प्रतिभा यांनी या शास्त्र आणि कलाकौशल्याची नेमकेपणाने मांडणी यामध्ये केली आहे. * मानसिक वेदना, दु:ख, चिंता, भीती यांसारख्या विकारांना आपल्या मनातून हुसकावून लावण्यासाठी 'गोल्डन मानसशास्त्रीय प्रथमोपचार' पद्धती ही लेखिकेने स्वत: विकसित केली आहे. ही पद्धत व्यसनमुक्ती, गैरवर्तन, शारीरिक शोषण यांवरही उपयुक्त ठरू शकते, हे सांगितले आहे. *'फिश! फिलॉसॉफी', 'बुद्धिबळाचा खेळ' या अनोख्या, नावीन्यपूर्ण उपचारपद्धतीतून उत्तम जीवन कसे जगावे; याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले आहे. * स्पर्शातील जादू, कॉफीपान, दीर्घ श्वसन, प्रार्थना यांबरोबर आठ सत्रांमध्ये एक-एक कृती (टास्क) देऊन साधकाला आपल्या मनाचे व्यवस्थापन कसे करावे, याचे साध्या-सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. * मराठी वाचकांसाठी 'मानसशास्त्रा'सारखा किचकट विषय या पुस्तकामधून समजून देण्यात आला आहे. त्यामुळे समुपदेशक, साधक, मानसशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी, मानसिक त्रासाने ग्रस्त व्यक्ती व तिच्या कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शक आहे.
© 2023 Sakal Media Pvt. Ltd (Audiobook): 9789395139663
Release date
Audiobook: 7 January 2023
English
India