Step into an infinite world of stories
4.3
Economy & Business
अर्थसाक्षर व्हा ! हे व्यक्तिगत आर्थिक नियोजनाबाबत सोप्या भाषेत सखोल माहिती देणारे लोकप्रिय मराठी पुस्तक आहे.
आपल्याला कमावलेले पैसे नेहमीच अपुरे वाटत असतात. मात्र कमवलेल्या पैशाचा नेमका उपयोग कसा करायचा आणि त्या पैशात वाढ कशी करायची यासाठी आपण अर्थसाक्षर असण्याची गरज असते. सीए अभिजित कोळपकर यांनी याच मुद्यावर लक्ष केंद्रित करून या पुस्तकात पैशाचा नेमका वापर कसा करायचा आणि आर्थिक नियोजन करून पैशाचे जतन व संवर्धन कसे करायचे हे समजावून दिले आहे.
‘अर्थसाक्षर व्हा !’ एकूण ६ भागांमध्ये विभागण्यात आले आहे. १.ओळख अर्थसाक्षरतेची २.आर्थिक नियोजन ३.विमा व कर्ज व्यवस्थापन ४.गुंतवणूक नियोजन ५.शेअर्स व म्युच्युअल फंड ६.आर्थिक फसवणुकींपासून सावधान !
पुस्तकात विविध प्रकारची उदाहरणे, संस्कृत सुभाषिते, प्रसिद्ध व्यक्तींची वचने, आवश्यक अशी प्रश्नावली यांचा नेमका वापर करून अर्थ विषय सोपा केला आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखे आपण आपल्या आयुष्यातील मिळकतीचे नियोजन तितक्याच नेमक्या पद्धतीने कसे केले पाहिजे, हे "अर्थसाक्षर व्हा !" मध्ये अत्यंत सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे.
Release date
Audiobook: 8 December 2022
English
India