Step into an infinite world of stories
एका शहरामध्ये हरिजनवाडा जाळला गेला. त्यात दोन माणसं मृत्युमुखी पडली. त्यानंतर अशा घटना अनेक गावांमधून घडत गेल्या. शेकडो वर्षे ज्या देशात संतांची शिकवण नांदते आहे, त्या देशात, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुध्दा पंचवीस वर्षांनी या घटना का घडतात? का घडाव्यात? या मनातील व्यथेवर विचार करत करत गावोगावी हिंडून गोळा केलेल्या तपशीलातून साकार झाली ती ही समिधा.स्वातंत्र्य समता व बंधुता हे मुख्य उद्दीष्ट मानून दलित साहित्याची वाटचाल सुरू झाली. याच वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण कलाकृती म्हणजे रणजित देसाईंची 'समिधा' होय. अस्पृश्यता' हा हिंदू धर्माला लागलेला कलंक. त्यामुळे दलितांवर नेहमीच अपमानीत जीवन जगण्याची वेळ आली. शहरापेक्षा ग्रामीण भागातील दलितांना अधिक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंपरागत अन्याय-अत्याचाराला विरोध करणार्या दलितांना कोणत्या प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते याचे प्रभावी चित्रण 'समिधा'मध्ये आढळते.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815424
Release date
Audiobook: 5 June 2020
English
India