Step into an infinite world of stories
मुंबई शहरातील दोन गडगंज श्रीमंत उद्योगपती.पद्मनाभ खंडेलवाल आणि शशिकांत भोईटे यांच्या भीषण हत्या होतात. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीच्या हातावरील बंगाली भाषेतील एक तारीख आणि त्याजागी असलेली कालिकादेवीची मूर्ती या दोन गोष्टी या दोन्ही गुन्ह्यात समान असतात.पण या व्यतिरिक्त त्या जागी हाताचे किंवा बोटाचे ठसे, खुनाचं हत्यार किंवा इतर कुठलाही पुरावा सापडत नाही. या विचित्र गुन्ह्याने पोलीस अधिकारी रक्षिता रंगनाथन आणि डिटेक्टिव्ह विश्वजीत भार्गव चक्रावून जातात. पण जेंव्हा डिटेक्टिव्ह विश्वजीत या दोन्ही व्यक्तीच्या भूतकाळाचा शोध घेतात तेंव्हा अनेक विचित्र आणि रहस्यमय गोष्टी बाहेर पडतात. आपल्या परिपूर्ण तपासपद्धतीने रक्षिता काही व्यक्तीना संशयित म्हणून स्थापित करते तर डिटेक्टिव्ह विश्वजीत या दोन्ही व्यक्तीच्या भूतकाळातील घटनांचे विश्लेषण करून गुन्हेगार शोधण्याचा प्रयत्न करतात. काय असतं या दोघांच्या भूतकाळातलं रहस्य ? संशयितांचा तपासावरून गुन्ह्याची उकल करण्यात रक्षिता यशस्वी होते का ? डिटेक्टीव्ह विश्वजीत आपल्या पद्धतीने तपास करीत गुन्हेगारापर्यंत अचूकपणे पोचतात का ? वेगवेगळी वळणे आणि अनपेक्षित कलाटण्या असणारी , क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी आणि वाचकांना मंत्रमुग्ध करून उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद देणारी डिटेक्टिव्ह कादंबरी कालिकादेवीचा न्याय !
© 2024 Zankar Audio Cassettes (Ebook): 9789364380911
Release date
Ebook: 22 November 2024
English
India