Step into an infinite world of stories
ही कादंबरी म्हणजे मनुष्यजातीच्या अस्तित्वाची न संपणारी गोष्ट आहे. एका अर्थी लेखिकेचा व्यक्ती आणि समष्टीच्या अर्थाने चिंतनशील उत्क्रांत प्रवासच आहे. मनुष्यजातीविषयी त्यांची चिंतनशीलता तुम्हा आम्हाला अंतर्मुख करून जीवनाला सामोरे घेऊन जाणारी अशी आहे. न संपणारी गोष्ट तुमची आमची सर्वांचीच आहे. या कथेतील पात्रांना लेखिका खेळवत नाही तर ही पात्रेच लेखिकाला न संपणा-या आस्तित्वातल्या स्वीकारायला लावतात. मानवी जीवनातली सर्व त-हांचे अंतर्विरोध, भावनांचा कल्लोळ आणि अगतिकता सर्वच काही- मानवी जीवनाचे जे भलेबुरे आहे ते या कादंबरीतून व्यक्त होते. लेखिकेने दिलेला मानवी जीवनाचा हा प्रत्यय तुम्हा आम्हाला अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. सरासरी आयुष्याच्या या मर्यादा ओलांडून हा जीवनाचा खळाळता पारदर्शी प्रत्यय, प्रवास, ही नेव्हर एंडिग स्टोरी तुम्हालाही सर्जनशीलतेचा अनुभव देऊन जाईल - नामदेव ढसाळ
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356041233
Release date
Audiobook: 28 July 2023
English
India