Step into an infinite world of stories
बाई जोपर्यंत लज्जा, संकोच न् त्यागाची सहनशील वस्त्रं उतरवत नाही, तोवर तिचं भोगणं, तिचं दुःख हे दुर्लक्षित किंवा गृहीत धरलं जातं...न् स्त्रीचं दुःख गृहीत धरलं जाणं हे ज्या समाजाला मान्य असतं, तो समाज तिला कौतुक, सहानुभूती किंवा वाटोळं या तीन गोष्टींशिवाय दसरं काहीही देऊ शकत नाही. समाजाला ते बळी जाणं अंगवळणी पडतं; सवयीचं होतं. माझ्या व्यक्तिगत आयुष्याची चामडी सोलून काढली पूर्णत: न काही जण त्याला वातड म्हणाले, तरीही हरकत नाही. एक वेगळं अनुभवविश्व जगलेलं माझं आयुष्य या घडीला समोर येणं आवश्यक वाटतं मला-माझ्या दृष्टीन...स्वत:च्या आयुष्याला सामोरं जाणं यापेक्षा चारचौघांसमक्ष त्याचं निखळ नग्र रूप पाहण जास्त कठीण आणि दाहक असतं. आत्मचरित्र आजवर कित्येकांनी लिहिलंय..पण आत्मचरित्र लिहिलं म्हणजे खरंच माणूस मांडून होतो का? कुठलीही महत्त्वाची व्यक्ती नसलेली मी केवळ स्त्री म्हणून माझ्या आयुष्याच्या संगळ्व्या खिडक्या- दारं उघडायचं ठरवलं! हे एक मूर्ख धाडस म्हणा किंवा काहीही म्हणा... शेवटी लिहिणं-सांगणं...या गोष्टी काही वेळा इतक्या अपरिहार्यपणे, अटळपणे घडत जात असतात, कीसमोर प्रेक्षक-वाचकवर्ग असला काय, नसला काय, त्या आपल्या बोलत असतात. मला एक स्त्री म्हणून या पुरुषप्रधान संस्कृतीकडे न्यायमागायचाय , माझ्यापुढे माझी भूमिका स्पष्ट आहे.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356041158
Release date
Audiobook: 16 September 2023
English
India