Step into an infinite world of stories
4
Fantasy & SciFi
जगाच्या निर्मितीपासून भौतिक, जैविक पातळीवर होणाऱ्या उत्क्रांतीने डिजिटल क्रांती चे शिखर गाठले आहे. आयझॅक ॲसिमोव्ह, रॅाबर्ट हाईनलाईन, जयंत नारळीकर ह्यांच्यासारख्या देशोदेशीच्या शास्त्रज्ञांनी रेखाटलेली जगाच्या प्रगतीची काल्पनिक चित्रे आज प्रत्यक्षात आलेली आपण अनुभवतो आहोत. मात्र डिजिटल क्रांतीच्या ह्या युगात एक बाब अघिकाधिक घातक होऊ लागली आहे. मानवी मन! मानवी मन सातत्याने वर्चस्वाच्या लढाईंचे खेळ खेळते आहे. जागतिक पातळीवर वैज्ञानिक कल्पना प्रत्यक्षात आणणारा अलौकिक बुद्धिमत्तेचा निरंजन लघाटे (आपला कथानायक) ह्या वाटचालीत काय गमावतो हे ह्या वैज्ञानिक काल्पनिकेत ऐकू या. अशी काल्पनिकता भविष्यात प्रत्यक्षात अनुभवायला मिळू नये आणि मानवाचा ’गिनी पिग’ होऊ नये हीच मनोमन प्रार्थना
© 2025 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364383240
Release date
Audiobook: 11 February 2025
Tags
English
India