Step into an infinite world of stories
शाईस्तेखानाने स्वारी करून स्वराज्याची लुट करुन अतोनात नुकसान केले. त्याची भरपाई आवश्यक होती आणि ती औरंगजेबाची आर्थिक राजधानी सुरतेची लुट करूनच होणार होती! त्याआधी सुरतेची वित्तंबातमी काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी निवड केली बहिर्जीचा चेला राघोजी आणि काही जांबाज गुप्तहेरांची आणि सुरु झाला एक चित्तथरारक रहस्यमय प्रवास! राघोजीने सुरतमध्ये कसा प्रवेश केला? जीवावरचे धोके पत्करून कशी गुप्त माहिती काढली? त्याच्या साथीदारांनी काय पराक्रम गाजवले? परदेशी वखारींची कशी वासलात लावली? सुरतच्या सुभेदार इनायतखानाचे असे नेमके काय रहस्य होते? राघोजीला सुरतमध्ये अनपेक्षित सहकार्य करणारे नेमके कोण होते? त्यांच्यात कोणी गद्दार होता काय? उदात्त हेतूसाठी जगातील सर्वात मोठ्या योजनाबद्ध स्वारी आणि शिस्तीत केल्या गेलेल्या लुटीची चित्तथरारक, बुद्धीमान डावपेच आणि अंगावर रोमांच उभे करणारी, गुंतागुंतीच्या रहस्यांनी भरलेली जबरदस्त शिवकालीन हेरकथा.
Release date
Audiobook: 22 April 2024
English
India