Step into an infinite world of stories
4.7
Biographies
गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला.गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे. वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही.गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक तराजू बनविला. त्या काळात अॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला. पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणीमुळे लागले.आपल्या सिद्धान्तांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलिओने पुन्हा हार मानली. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या ७८व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची पाच वर्षे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो. अशा या अफाट जिनीयस शास्त्रज्ञाचे चरित्र आपण ऐकायलाच हवे.
Release date
Audiobook: 27 December 2020
English
India