Step into an infinite world of stories
5
Non-Fiction
करीयर कंपास हे पुस्तक लेखक डॉ ऋषिकेश बोधे यांनी लिहिले आहे.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा... ह्या तत्त्वावर माझा विश्वास आहे. आयुष्यात प्रत्येक चूक स्वतः करून पहायची नसते. तसं मी फार काही आयुष्यात प्रचंड मोठं असं मिळवलं नाही ह्याची मला जाणीव आहे. पण मागील दहा वर्षांच्या तुटपुंज्या अनुभवातून किमान मला आयुष्यात करियर बाबतीत नक्की काय करायचे आहे याचं मला माझ्या पूर्त तरी थोडे clear झाल्यासारखं वाटतं. पण ही स्पष्टता दहा वर्षांपूर्वी नव्हती... तेव्हा तर internet नसताना सुद्धा मी गोंधळलो होतो , तर आता भरमसाठ options असताना मुलांचं काय होत असेल ? दहावी बारावी दरम्यान मन इतकं चल विचल असतं की सगळच करावसं वाटतं. हेच confusion कमी करण्यासाठी मी माझे अनुभव , वाचलेली पुस्तके , मित्रांचे अनुभव यांचा एकत्रित अभ्यास करून छोटीशी पुस्तिका लिहली आहे. तसा विचार होता print करायची. पण पन्नास शंभर पानांचं पुस्तक छापायला सहसा कोणी तयार होत नाहीत. आपल्याला career counseler किंवा Motivation देत बसायचं नाहीये , हेतू फक्त इतकाच की माझ्या छोट्या मित्रांना सांगणं की बाबा रे , माझ्या सोबत असं असं झालं आहे . . . तू विचार करून निर्णय घे....
Release date
Audiobook: 10 January 2025
English
India