Step into an infinite world of stories
4.8
3 of 15
Biographies
शिवाजीराजे लहानपणी गोज-या गुटगुटीत बाळशामुळे सर्वांचेच लाडके बनले होते. राजे हळूहळू मोठे होऊं लागले. सौंगड्यांबरोबर खेळू लागले. त्यांना आता खेळ आवडू लागला तो गडकोटावरिल लढायांचा. मातीचे ढिगारे करून त्यांना ते गडकोट म्हणत. मग या गडकोटांची नाकेबंदी सुरू होई. चिमुकल्या सैन्याचे हल्ले, मोर्चे आणि प्रतिकार सुरू होत. रणघोषांनी दिशा धुंद होत. राजे रंगत होते, खेळातल्या राज्यात अन् राज्यांच्या खेळात. या खेळातले गड ते शर्थीने जिंकत होते. नवे गड जिंकत होते. राजांचे हुकूम सुटत होते. या बाळफौजांना जिजाऊचे अंगण अपुरे पडत होते... जिजाऊसाहेब या राजांच्या युध्दक्रीडा बघत होत्या. ही आजची स्वप्ने उद्या सत्यात येतील, ही आजची फुलपाखरे उद्या गरूड होतील, आस्मान जिंकतील, हीच आशा आणि आकांक्षा त्यांच्या मातृनयनात तेजाळत नव्हती काय?
Release date
Audiobook: 29 November 2020
English
India