Step into an infinite world of stories
१४ ऑगस्ट १९४७ ची रात्र. दीडशे वर्षांच्या परकीय गुलामगिरीतून भारत मुक्त झाला तो दिवस. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून सर्व भारतीयांना उद्देशून भाषण केलं. त्या घटनेला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. साडेसात दशकाचं स्वातंत्र्य आपण उपभोगलं आहे. ज्ञान, विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण इ.असंख्य क्षेत्रातले आपले यश लक्षणीय आहे. शिवाय 'सामाजिक समता' ही आपल्या समाज निर्मितीची एक विलक्षण बाजू आहे. सर्वार्थाने संपन्न, सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी आपली जगात ओळख आहे. आपला देश सामर्थ्यशाली आहे. आधुनिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात लोकशाही आहे. 'लोकशाही' हे जगण्याचं एक सर्वोच्च मूल्य आहे. आपण लोकशाही भारताचे नागरिक आहोत. लोकशाही या शब्दाचा दुसरा अर्थ 'स्वातंत्र्य'.
Release date
Audiobook: 15 August 2022
English
India