Step into an infinite world of stories
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं! पुण्याच्या कॉफीशॉपमधे जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा, आजच्या जमान्यातील JFK नावाचा एक कलंदर ग्रूप. त्यांच्या हाती एका गडावर लागते एक अकल्पित खूण आणि मग होते एका रोमांचक साहसाची सुरवात. एका संचिताच्या शोधप्रयत्नात आपली अस्मिता, भारतीय सांस्कृतिक आदिबंध यांची आठवण करून देणारा हा चित्तथरारक प्रवास! ज्ञात, अज्ञात इतिहास आणि कल्पित व सत्य यांच्यातील पुसट सीमारेषांवरवर आट्यापाट्या खेळणारी ही महाकादंबरी आपल्यासमोर भारताचा वारसा काय आणि त्याचं वर्तमान काय असे अनेक प्रश्न उपस्थित करतील . आंतराष्ट्रीय घटना, सद्य परिस्थितील सामाजिक, राजकीय संदर्भ आणि व्यक्तिरेखा, प्राचीन, मध्ययुगीन आणि वर्तमान अशा त्रिकालाला व्यापणारे संदर्भ... स्थलकालाच्या अशा भव्य रंगमंचावर प्रकटत जाणारे हे नाट्य! मग, वाट कसली पाहताय? शुभास्ते पंथानः!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354344510
Release date
Audiobook: 1 November 2021
English
India