Step into an infinite world of stories
Story 2 - The Tell-Tale Heart Short story by Edgar Allan Poe
ऑडिओ माध्यमाचा उपयोग करून एक नवीन प्रयोग - मराठी मधून Bringing a series of appreciations of selected World Classics In English संगीत, नृत्य, चित्र, यांच्यासारखाच, कथा हा मानवजातीच्या सर्वात पुरातन वारशांपैकी एक महत्त्वाचा. अगणित पिढ्यांचं मन रमवता रमवता त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करून आयुष्याची जाण वाढवणारा. बृहत्कथा काव्याचं उदाहरण म्हणजे महाभारत. आशय अठरा पर्वात मावेना म्हणून व्यासांना कथा पूर्ण करणारा हरिवंश जोडावा लागला. हे 116000 श्लोक एका बैठकीत वाचणं केवळ अशक्य. पण विरुद्ध टोकावरची लघुतम कथा मुंबई लोकलच्या गर्दीत धक्के खातही दोन स्टेशनांच्यामध्येच वाचून होते आणि दीर्घकाळ लक्षात राहू शकते. कमीत कमी शब्द पात्र आणि घटना यांचा वापर करीत एकच प्रमुख मननीय विचार किंवा सखोल भावावस्था बिंबवणारी लघुकथा मराठी साहित्यात उत्क्रांत झाली. तिला पौर्वात्य आणि पाश्चात्य अशा दोन्ही कथा परंपरांचं संचित लाभलेलं आहे. तिचं रचनातत्व समजून घ्यायचं तर पाश्चात्त्य लघुकथेचा परिचय करून घेणं उपयोगाचं ठरतं. सर्वसामान्य वाचक, साहित्याचा विद्यार्थी, कथा परीक्षणाचं तंत्र आत्मसात करू इच्छिणारा माध्यम विद्यार्थी आणि कसदार कथा लेखन करू इच्छिणारा कथा पटकथालेखक या सर्वांना, उत्तम दर्जाच्या पाश्चात्त्य कथांची ओळख करून घेण्याचा उपक्रम आवडीचा ठरेल अशी दाट शक्यता आहे. या प्रसिद्ध कथेला सुगम मराठी मध्ये आपल्यासमोर मांडत आहेत इंग्रजीचे ज्येष्ठ प्राध्यापक अरुण भागवत सर्व साहित्य प्रेमींनी नक्की आस्वाद घ्यावाच अशी ऑडिओ सिरीज आता स्टोरीटेल वर ... टीप - प्रत्येक कथेच्या सादरीकरणात: कथाकाराचा अल्पपरिचय, कथेचा सारांश, मूळ कथेची भाषा आणि शैली यांचा अंदाज येण्यासाठी महत्त्वाचे उतारे, आणि त्यांचा मराठीत काहीसा मुक्त अनुवाद, रसग्रहण आणि कथेची लक्षात घेण्याजोगी वैशिष्टयं अर्धा ते पाऊण तास चालणाऱ्या ऑडिओ बुक मध्ये बसवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला आहे. या सिरीज मधील दुसरी कथा The Tell-Tale Heart Short story by Edgar Allan Poe
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364383547
Release date
Audiobook: 8 August 2024
English
India