Step into an infinite world of stories
तमसो मा हा कथासंग्रह राजहंस प्रकाशनाने २००१ साली प्रकाशित केला.ह्यात पाच दीर्घकथा आहेत.त्या आधी महाराष्ट्र टाइम्स, मौज, अनुष्टुभ आणि रुची दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्या होत्या. कुरुलकरांच्या कथेने सामान्य वाचकापासून समीक्षकापर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कुरुलकरांच्या कथेतून प्रकट होणारे बदलत्या काळाचे भान. काळ बदलतो तशी माणसं बदलतात, त्यांचे जीवनमान बदलते, प्रश्नही बदलतात. या प्रश्नांच्या उत्तरात बदलत्या काळाची प्रतिबिंबे कुरुलकर यांच्या संवेदनशील लेखणीला ती दिसतात. ती न्याहळता न्याहाळता त्यांची कथा आकार घेते. ती शब्द रूप घेत असताना स्वतः प्रश्नांच्या भोवऱ्यात प्रवेश करते आणि वाचकालाही अलगद त्यात ओढून नेते तो नकळत त्यात गुंतत जातो.
Release date
Audiobook: 20 November 2024
English
India