Step into an infinite world of stories
4
11 of 77
Economy & Business
समोर बसलेल्या पाच शार्क लोकांना आपलं जुगाड समजावून सांगणाऱ्या 'जुगाडू कमलेश'चा व्हिडीओ तुम्ही कुठे ना कुठे पाहिलाच असेल! नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावसारख्या छोट्या तालुक्याच्या ठिकाणाहून आलेला आपला हा जुगाडू कमलेश सोनी टीव्हीच्या ‘शार्क टॅंक’ नावाच्या रिएलिटी शोमध्ये झळकला आणि देशभरात पोहोचला. त्या शोमधील पियुष बन्सल नावाच्या एका शार्कने त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केलीय. कमलेशच्या महत्त्वाकांक्षेला बळ मिळालंय.
भारतात सुरू झालेल्या स्टार्टअप्सना, ते सुरू करणाऱ्या जुगाडू कमलेशसारख्या हुशार लोकांना मंच मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करून देण्यासाठी ‘शार्क टॅंक इंडिया’ नावाचा शो गेल्या वर्षी झाला. त्याचा इथल्या स्टार्टअप्सच्या वातावरणात खरंच काही फरक पडला का? हा शो नक्की सुरू कसा झाला होता? जाणून घेऊया…
Release date
Audiobook: 14 February 2022
English
India