Step into an infinite world of stories
चीनी तिबेटमध्ये जाऊन लडाखमध्ये घुसखोरी करण्याच्या योजनेच्या सूत्रधारालाच ठार मारण्याची अत्यंत धाडसी कामगिरी समीर चक्रवर्तीवर आली खरी पण या वेळेस सारे काही सोपे नव्हते. तिबेटच्या भयाण थंडीत आणि दुर्गम प्रदेशातून चीनी लष्करापासून जीव वाचवत दूर पळत असताना समीर अनपेक्षितपणे एका वेगळ्याच गूढ आणि रहस्यमय प्राचीन खजिन्याच्या जीवघेण्या शोधात सापडला.
कोणाचा होता हा खजिना? त्याचा भारताशी काय संबंध होता? कोण होता जोरावरसिंग? तो खजिना शोधण्यात समीरला यश आले का? ले. जन. वांग कैला ठार मारण्याची त्याची धाडसी योजना यशस्वी झाली का? आणि तिबेटी स्वातंत्र्य लढ्याचे पुढे काय झाले? या आणि अशाच अनेक चक्रावून टाकणा-या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ऐकलीच पाहिजे अशी विलक्षण धाडसकथा!
भारताचा लाडका सुपर हिरो समीर चक्रवर्ती याची संजय सोनवणी यांनी लिहिलेली ही अत्यंत वेगळ्या पार्श्वभूमीवरील साहसकथा तुम्हाला रहस्य आणि थराराच्या जाळ्यात अलगद घेऊन जाईल.
© 2023 Storytel Original IN (Audiobook): 9789356047754
Release date
Audiobook: 27 November 2023
English
India