Chitrakatha Sayali Kedar
Step into an infinite world of stories
लव्हस्टोरी ॲट बुधवार पेठ ही गोष्ट आहे गावाकडच्या गजा नावाची मुलाची. गरीब आणि साधाभोळा. पण, नशीब त्याला बुधवार पेठेत घेऊन गेलं आणि तिथंच तो त्याचं काळीज हरवून बसला. खुशबू नावाच्या एका वेश्येवर तो प्रेम करू लागला. आयुष्यातलं पहिलं आणि खरं प्रेम. पण, पुढे काय? 'वेश्येवर प्रेम करण्यापेक्षा आत्महत्या कर' असं ओरडून सांगणाऱ्या समाजात तो राहत होता. एका बाजूला होता समाज नावाचा विषारी विस्तव तर दुसऱ्या बाजूला होती खुशबू नावाची प्रेमळ वेश्या. समाजात जगायचं की प्रेमात मरायचं ? कसा होईल या प्रश्नाचा उलगडा ?
Release date
Audiobook: 14 February 2024
English
India