Step into an infinite world of stories
कातरवेळ ही कादंबरी सत्य घटनांवर आधारित आहे. आधुनिक विकसित सुशिक्षित युगात अजूनही घरातील एखाद्या अंधारी कोपऱ्यात दबलेल्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत आहे .माझ्या भोवती कितीतरी स्त्रिया दुष्ट अमानवी छळ सहन करीत आहेत. स्त्री सन्मान स्वातंत्र्य शिक्षण या नैतिक तेच्या कल्पना आजही प्रत्यक्ष आचरणात दिसत नाहीत .स्त्रीला जगदंबा लक्ष्मी सरस्वती पार्वती म्हणून पुजणारा समाज स्त्रीला मात्र गुलाम म्हणून वागवतो . स्त्री घरी दारी कुठेही सुरक्षित नाही. लहान मुलींवर घरातील पुरुषांनी बलात्कार केल्याच्या बातम्या रोज येतात .छोट्या छोट्या गोष्टींवरून पत्नीचा खून होतो. आजही स्त्री कुठेच सुरक्षित नाही हे कटू सत्य संपूर्ण समाजाला माहित आहे पण सर्वजण डोळे कान बंद करून दुर्लक्ष करीत आहे हा दबलेल्या हुंदक्यांचा आवाज बहिर्या समाजाला ऐकवण्यासाठी ही कादंबरी लिहिली आहे.
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514513
Release date
Audiobook: 5 March 2024
English
India