Step into an infinite world of stories
भ्रम तुला झाला , मला नाही. वेड यांना लागलं, मला नाही. पण दूषणं मात्र मला. ज्या निरोधानं गावपातळीवरची लोकप्रियाता मिळवणारी कविता जन्माला घातली तो निरोध कोणाचा होता? तो निरोध यांचा होता, तो निरोध सुनंदनचा होता. पुरता वेडसर माणूस होता तो, पूरता वेडा . लग्न झाल्या दिवसापासून घरात निरोधांची पाकिटं बघतीय मी. रोज विकत घ्यायचे पण वापरला एकदा पण नाही. ते तसेच पडून राहीले, कोरडे. त्यांना ना सुनंदनच्या इंद्रियाचा स्पर्श होता, ना माझ्यातल्या स्त्रीचा. सहा महिने कोरडे गेले. नित्यनेमाने येणारा प्रत्येक मास मला चार दिवस पूजेची फुलं काढण्यापासून रोखू लागला, असे किती दिवस घालवायचे होते मी ?
प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या घटनांची सांगड घालणारी कथा " चौरंग " किशोर कदम यांच्या आवाजात !
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789353816728
Release date
Audiobook: 3 November 2023
English
India