Step into an infinite world of stories
चक्रव्यूह...एक व्यक्ती रस्त्यात मरून पडलेली... चेहर्यावर वेदना...छातीवर टाचण्यांनी ‘चक्रव्यूह’ कोरलेला... आणि उजव्या फोरआर्मवरही तसाच चक्रव्यूह गोंदवलेला! रेसर कार गायब! हिरव्यागार शेवाळ्यानं भरलेल्या तळ्याच्या काठाशी रेसरच्या खुणा जाऊन संपलेल्या...!!! कोणी केला हा खून...? काय होती ही ‘चक्रव्यूह’ संघटना? १० वर्षांपासून ‘चक्रव्यूह’ चर्चेत नसताना अचानक ‘चक्रव्यूह’ समोर येऊन ठाकली होती. आणि ते देखील सुप्रसिद्ध खासगी गुप्तहेर मंदार पटवर्धन याला चॅलेंज देऊन...! काय होणार पुढे? मंदार स्वत:च अडकणार या चक्रव्यूहात अभिमन्यूप्रमाणे? की, करणार ‘चक्रव्यूह- भेद’? सुहास शिरवळकरांच्या भन्नाट शैलीतून उतरलेली ही उत्कंठावर्धक रहस्यकथा...ऐका प्रसाद फणसेंच्या आवाजात!
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356042100
Release date
Audiobook: 3 June 2023
English
India