Step into an infinite world of stories
बोक्या आणि त्याचा मित्र संदीप सोरट गेलेत कॉलनीतल्या चावरे काकांकडे. गणेशोत्सवासाठी वर्गणी मागायला गेले असताना बोक्या आणि संदीपला, चावरे काकांच्या घरी एका बंद खोलीत कुणी तरी वावरत असल्याचा, कण्हल्याचा आवाज ऐकू येतो. चावरे काक-काकू आतल्या खोलीत गेले असताना हे दोघं हळूच त्या कुलूपबंद खोलीजवळ जाऊन आत काय असेल, याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतात. तेवढ्यात चावरे काका बाहेर येऊन दोघांना ओरडतात. त्यामुळे हे दोघं वर्गणी न घेताच तिथून काढता पाय घेतात खरा...पण चावरे काकांच्या घरातल्या कुलूपबंद खोलीत असं नेमकं दडलंय तरी काय, या रहस्याचा शोध लावल्याशिवाय स्वस्थ बसेल तो बोक्या कसला! चला तर ऐकूया ही बोक्याची धम्माल शोधमोहीम आणि इतर गोष्टी दिलीप प्रभाळवकरांसह बोक्या सातबंडे: भाग - ५
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353989811
Release date
Audiobook: 12 December 2021
English
India