Step into an infinite world of stories
बोक्या सातबंडे या दिलीप प्रभावळकरांच्या मानसपुत्राशी एव्हाना तुमची चांगलीच गट्टी झाली असेल. त्याने काय काय खोड्या केल्यात, त्याचे मित्र, मित्रांच्या गोष्टी, शाळेतली धम्मालही तुम्ही ऐकलीत.आता या भागातही तुम्ही ऐकणार आहात अशाच धम्माल गोष्टी! पण मित्रांनो आपला बोक्या जितका मस्तीखोर आहे, तितकाच तो कनवाळू आणि गरजूंना मदत करणाराही आहे बरं का! तर बोक्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये एडमिट केल्यावर, तो तिला बघायला जातो आणि तिथे एडमिट असलेल्या गेना नावाच्या गरीब मुलाला मदतही करतो आणि अशाच एका आजोबांनाही मदत करण्यासाठी एक सॉल्लिड प्लॅन करतो. यावेळी तो त्याच्या प्लॅनमध्ये चक्क त्याच्या बाबांना आणि दादालाही सामावून घेतो. आता पुढे काय होणार? तुम्हाला उत्सुकता वाटतच असेल. मग ऐकताय ना, दिलीप प्रभाळकरांसोबत ‘बोक्या सातबंडे: भाग - ४’
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353989804
Release date
Audiobook: 5 December 2021
English
India