Step into an infinite world of stories
5
Biographies
दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केलेली आहे. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक अनुक्रमवार आधारीत घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टीकोन होता. भोजराजाचे खगोलशास्त्र, विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, भर्तुहरीचा शिलालेख आणि अनेक संस्कृत हस्तलिखितांचे त्यांनी संपादन केले. ज्योतिष, खगोल आणि नाणकशास्त्राचे ते व्यासंगी संशोधक होते. सिंधुची अर्थव्यवस्था, मौर्यांची उत्पत्ती, भारतीय समाजरचना, स्त्री व शूद्रांची स्थिती, भारत-रोमन व्यापार, आर्यांचा विस्तार, मौर्य साम्राज्याची अर्थस्थिती याविषयी त्यांनी मूलभूत संशोधन मांडले. त्यांच्या संशोधनाविषयी ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789369318681
Release date
Audiobook: 28 July 2020
Tags
English
India