Step into an infinite world of stories
3.8
Religion & Spirituality
AMSY
द पॉवर बियॉण्ड युअर सबकॉन्शिअस माईंड
अदृश्य शक्तीचे चमत्कार व सात फायदे
आज माणूस सतत जो मोबाईल घेऊन फिरत आहे, त्या लहानशा मोबाईलमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले असते. फक्त अट एकच की मोबाईल इंटरनेटला जोडलेला असला पाहिजे. तुम्ही सर्वजण जाणता की इंटरनेट एका अदृश्य तरंगांनी एका टॉवरशी जोडलेले असते.
त्याचप्रमाणे प्रत्येकजण एका अदृश्य शक्तीशी जोडलेला असतो. फरक इतकाच की आपण त्याबाबतीत अनभिज्ञ असतो. ही शक्ती आपल्या अंतर्मनाच्या शक्तीच्याही पलीकडे आहे. ती आहे ए.एम.एस.वाय.ची शक्ती. अगदी बरोबर! हा शब्द कदाचित तुम्ही पाहिल्यांदाच ऐकला असेल. पण ए.एम.एस.वाय. हा आपल्या शरीराचाच एक अदृश्य भाग आहे. एकदा का तुम्ही या अदृश्य भागाशी जोडले गेलात तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल व तुम्ही तुमचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकाल.
उदाहरणार्थ,
तुम्ही विकासाच्या उच्चतम स्तरावर जीवन जगू शकता. नात्यांमध्ये सखोल प्रेम अनुभवू शकता. अदृश्य ए.एम.एस.वाय.च्या शक्तीच्या आधारे तुम्ही तुमच्या जीवनातील न उलगडलेल्या समस्यांचे निराकरण करू शकता. सर्व निर्जीव वस्तूही उदाहरणार्थ, मोबाईल फोन, लॅपटॉप, गाडी, घर इ. तुमच्यासाठी चांगले काम करू शकतात. लोकांशी व निसर्गातील सर्व प्राणिमात्रांशी तुमचे नाते चांगले होऊ शकते. निरोगी आयुष्याबद्दल समज प्राप्त करून तुम्ही स्वतःला तसेच इतरांनाही निरोगी ठेवू शकता. जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन राखणे तुम्ही शिकू शकता. प्रस्तुत पुस्तकामध्ये मानवी शरीरांच्या सर्व रहस्यांवरील पडदा एकेक करून दूर केला जात आहे. ते समजून घ्या व सरप्राइज गिफ्ट उघडून बघा. तुम्ही आर्श्यचकित व्हाल व जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल.
© 2024 WOW Publishings (Audiobook): 9789390607709
Release date
Audiobook: 13 May 2024
English
India