Step into an infinite world of stories
3.4
Personal Development
यशाची पहिली ओळख- एकाग्र मन
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एकाग्रतेची गरज असते. समजा, एक डॉक्टर, ऑपरेशन टेबलवर ऑपरेशन करत असताना पूर्णपणे एकाग्र होऊ शकत नसेल तर ऑपरेशन टेबलवरच्या रुग्णाची अवस्था काय होईल, हे तुम्ही जाणताच.
एखाद्या बिल्डरनं त्याच्या कन्स्ट्रक्शन कामामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं नाही तर त्या बिल्डिंगमध्ये राहणार्या लोकांचं भविष्य कसं असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
एखादा शिक्षक जर आपल्या विद्यार्थ्यांवर पूर्णपणे फोकस करत नसेल तर त्या विद्यार्थ्यांचं भविष्य कसं असेल, हे सांगण्याची गरजच नाही.
तात्पर्य- आज प्रत्येक क्षेत्रामध्ये 100 टक्के एकाग्रता आवश्यक आहे. पण जेव्हा याविषयी बोललं जातं, तेव्हा लोकांना वाटतं, की हे केवळ विद्यार्थ्यांसाठीच आहे. अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये याला महत्त्व दिलं जात नाही. कारण त्यावर काम करण्याची गरजही वाटत नाही. खरंतर प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक विभागामध्ये याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, अकाउंट्स, प्रॉडक्शन, सेल्स इत्यादी. कंप्युटरवर काम करणार्यांनाही एकाग्रता आवश्यक असते. तरच ते आपलं काम योग्य वेळेत आणि अचूकतेनं पूर्ण करू शकतात. एवढंच नाही तर पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक बनण्यासाठी गृहिणीलाही पूर्ण लक्ष देऊन स्वयंपाक करावा लागतो.
या पुस्तकात एकाग्रता शक्तीच्या दुर्बलतेची कारणं, त्यात येणार्या अडचणी आणि छोटी छोटी काम एकाग्रतेनं कशी करावीत, यासाठी 21 पद्धती (हॅक्स) सांगितल्या आहेत. यांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू शकता आणि हीच आहे एकाग्र मनाची ओळख!
© 2024 WOW Publishings (Audiobook): 9789390607136
Release date
Audiobook: 13 May 2024
English
India