Step into an infinite world of stories
वळू हा २००८ साली प्रदर्शित झालेला गिरीश कुलकर्णी यांनी लिहिलेला आणि उमेश कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला मराठीत गाजलेला विनोदी चित्रपट. या चित्रपटाची कथा गावात सोडून दिलेल्या एका वळूभोवती फिरते. या छोट्याशा गावातला हा वळू अचानक हिंसक बनतो व गावातील लोकांना त्रास द्यायला लागतो. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शहरातून वनाधिका-याला बोलवण्यात येते आणि त्याच्या वळूच्या पकडण्याच्या निमित्ताने गावातील राजकारण, तरूण मनातील प्रेमसंबंघ, जाती जातीतील संबंध, देव, मंदिरे, प्रथा आणि मानवी नातेसंबंधाचा पटच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. सतत हसवत अंतर्मूख करायला लावणारी वळू या चित्रपटाची पटकथा पहिल्यांदाच वाचली आहे प्रत्यक्ष लेखक आणि नामवंत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत. एखादा चित्रपटाची पटकथा लेखकाने स्वतःच वाचून दाखवताना किती मजा येते याचा अनुभव आपल्याला या निमित्ताने घेता येईल.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354345159
Release date
Audiobook: 24 April 2021
English
India