Step into an infinite world of stories
कै.मंगला वेलणकर या प्राध्यापिका, लेखिका, कवयित्री होत्या. त्यांचे संस्कृत, मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक नाटकं तसंच कथा, लेख, कविता, दीर्घकाव्ये, संस्कृतमध्ये मंगलाष्टके इ. लिहिलं. त्यांनी इतिहासातील आठ अनुल्लेखित स्रियांवर लिहिलेली दीर्घकाव्यं फार महत्वाची आहेत, तीच तुम्हाला इथं ऐकायला मिळणार आहेत. काय आहे या दीर्घकाव्यात? कुंती, देवकी, रावणपत्नी मंदोदरी, दुर्योधनपत्नी लक्ष्मणा, समर्थ रामदासांची न झालेली पत्नी, संत तुकारामांची पत्नी आवडी, डाॅ. आनंदीबाई जोशी आणि आजची स्री यांचे अनेक न उलगडलेले पैलू. आणि याचं सादरीकरण केलं आहे- वंदना गुप्ते, इला भाटे, सुकन्या मोने, अमृता सुभाष, रजनी वेलणकर, गौरी मोकाशी, मीरा वेलणकर आणि मधुरा वेलणकर यांनी!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356041554
Release date
Audiobook: 29 March 2022
Tags
English
India