Step into an infinite world of stories
काशीतील घाटांवर एक आंधळा पुजारी एका तरुण स्त्रीला मृत्यू आणि पुनर्जन्माच्या अनंत चक्रात तिला जखडून ठेवणाऱ्या तिच्या पूर्व जन्माचा स्वीकार करण्यास मदत करतो. तिला आठवणाऱ्या पूर्वजन्मात ती शकुंतला होती. चैतन्यमयी, धाडसी आणि अलौकिक कल्पना शक्ती लाभलेली, पण पौराणिक शकुंतले प्रमाणेच तिच्याही नशिबात परित्यक्तेचं जिणं लिहिलं होतं.
तिचा पती जेव्हा एका परस्रीला घेऊन येतो तेव्हा तिचं मन शंकेने आणि मत्सराने ग्रासून जातं. तेव्हा ती यदुरी नावाच्या पतित स्त्रीचं रूप धारण करून गंगेच्या काठावर भेटलेल्या एका ग्रीक प्रवाशाबरोबर जाण्यासाठी सज्ज होते आणि आपल्या घराचा , कर्तव्यांचा त्याग करते. ती दोघं मिळून काशीपर्यंत प्रवास करतात. तिथे ती भोगाच्या आहारी जाते. सगळे कायदे बंधन झुगारून आपली उपभोग घेण्याची इच्छा पूर्ण करते. पण लवकरच तिचे मन अस्वस्थ होतं आणि या विश्वाचा त्याग करणं तिला भाग पडतं .......
अभिनव आणि विदारक असलेली हि कादंबरी एका स्त्रीच्या विदारक आयुष्याचा ठाव घेते . इतिहास , धर्म, तत्वज्ञान यांचा समेळ साधून हि कहाणी प्राचीन वातावरणाचा परीघ ओलांडून त्याच्याही पलीकडे जाते.
नमिता गोखले लिखित मराठी कादंबरी "शकुंतला" गौरी लागू यांच्या आवाजात.
Release date
Audiobook: 12 December 2021
English
India