Step into an infinite world of stories
3.8
3 of 4
Personal Development
अॅनल सेक्स नैसर्गिक की अनैसर्गिक? सुप्रीम कोर्टानं ६ सप्टेंबर २०१८ या दिवशी आपल्या ऐतिहासिक निकालात आयपीसी कलम ३७७ कलम रद्दबातल ठरवत सज्ञान जोडप्यांतील समलैंगिक संबंधांना मान्यता दिली. अॅनल सेक्स अर्थात गुद मैथूनाचा विचार हा बहुतांश वेळा होमो पुरुषांचं सेक्शुअल ओरिएंटेशन या दृष्टीकोनातूनच केला जातो. पण केवळ होमोसेक्शुअल्सच नाही तर हेट्रोसेक्शुअल जोडपीही अॅनल सेक्स करतात असं आकडेवारी सांगते. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोलद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३६ टक्के बायकांनी तर ४४ टक्के पुरुषांनी आपण भिन्नलिंगी व्यक्तीसोबत अॅनल सेक्सचा अनुभव घेतल्याचे नमूद केले. थोडक्यात अॅनल सेक्सविषयी आपल्या समाजात खुलेपणानं बोललं जात नसलं तरी विवाहित जोडप्यांमध्येही परस्पर संमतीनं हे संबंध ठेवले जातात. हे असलं तरीही अॅनल सेक्सविषयी खूप सारे गैरसमज आणि भीती आहे. या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न या एपिसोडमध्ये आपण करणार आहोत.
Release date
Audiobook: 3 March 2022
English
India