Step into an infinite world of stories
4.4
Biographies
महाराष्ट्र या संतांच्या भूमीतले वारकरी संप्रदायातील एक अग्रगण्य नाव म्हणजे संत एकनाथ. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साधारण 250 वर्षानंतर संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. भारुड, गोंधळ, जोगवा, गवळण यांसारख्या गीत-प्रकारांनी नाथांनी समाजात जनजागृतीचे कार्य केले. अंधश्रद्धा रूढी-परंपराचे समाजावर पसरलेले गारुड या लोक रचनांमधून कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नाथांचा जन्म ई.स. 1533 मधे पैठण इथं झाला. त्यांचे वडील सुर्यनारायण आणि आई रुख्मिणी, आई वडिलांचा सहवास नाथांना फार काळ लाभला नाही. चक्रपाणी आणि सरस्वती या नाथांच्या आजी-आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. अवघे 12 वर्षांचे असतांना एकनाथांनी देवगिरीच्या जनार्दनस्वामींना आपलं गुरु केलं. सहा वर्ष आपल्या गुरूंकडे राहून नाथांनी संस्कृत शास्त्रपुराण आणि ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्म ग्रंथांचे अध्ययन केले. गुरुआज्ञा झाल्यावर नाथांनी सात वर्ष तीर्थयात्रा केली. तीर्थास्थानाला जातांना वाटेत तहानेने व्याकूळ झालेले गाढव दिसल्यावर त्याला गंगाजल पाजलं आणि खऱ्या भक्तीची प्रचीती दिली.नाथांच्या या वर्तणुकीने त्यांना वेदांताचा व्यापक अर्थ उमगलेला होता हे लक्षात येतं. सनातनी आणि कर्मठ समाजाला नाथांनी आपल्या या वर्तणुकीतून चांगलेच हादरे दिले होते. संत एकनाथ त्यांच्या कीर्तनातून देखील समाज प्रबोधन करीत असत. पैठण या तीर्थक्षेत्री आणि पंढरपूर ला देखील त्यांच्या कीर्तनाला अफाट जनसागर लोटत असे. वारकरी पंथात नाथांची कीर्तनं अत्यंत लोकप्रिय ठरली.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789391558741
Release date
Audiobook: 23 March 2023
English
India