Nadishta Manoj Borgaokar
Step into an infinite world of stories
अपार कष्ट करण्याची तयारी आणि तीव्र इच्छाशक्ती असेल तर अशक्य भासणारे कोणतेही ध्येय गाठता येऊ शकते. टिटवाळा येथील अद्ययावत श्रीमहागणपती रुग्णालयाचा प्रकल्प हे त्याचं आदर्श उदाहरण. चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित राहिलेल्या या भागात लोकसहभागातून रुग्णसेवेचा मोठा प्रकल्प उभा करण्याचा विक्रांत बापट यांनी केवळ संकल्प सोडला नाही तर त्याच्या सिद्धीसाठी अव्याहत प्रयत्न केले. एक प्रकारचा हा जीवनसंघर्षच; जो ऐकणाऱ्या प्रत्येकास नवी प्रेरणा देऊन जातो. समाजासाठी समर्पित भावनेतून काही करण्याची तळमळ मनात जागवतो. उदय सबनीस यांच्या समर्थ आवाजातून उलगडत जाणारी ही प्रभावी, प्रवाही आणि प्रेरक कहाणी `समर्पण` शब्दाची नेमकी ओळख करुन देते.
Release date
Audiobook: 1 March 2022
English
India