Step into an infinite world of stories
5
Religion & Spirituality
कोणत्याही प्राचीन राष्ट्राचा निर्भेळ इतिहास, निश्चितपणे ठरविण्याच्या कामी, तात्कालिन जगातील तदितर राष्ट्रांच्या साहित्यादिक लिखाणात सापडलेल्या अपोदबलक उल्लेखांचा फार उपयोग होतो. आज उपलब्ध असलेल्या आणि निश्चितार्थ ठरलेल्या, जगातील ऐतिहासिक साधनांमध्ये, भारताच्या ज्या प्राचीन कालखंडाला, असा, भारतेतर राष्ट्रांच्या सुनिश्चित साधनांचा पाठिंबा मिळतो, तो आपल्या इतिहासाचा कालखंड सम्राट चंद्रगुप्ताच्या काळाच्या आगेमागेच चालू होतो. कारण, अलेक्झांडरची स्वारी भारतावर जेव्हा झाली तेव्हापासूनच्या ग्रीक इतिहासकारकांच्या आणि पुढे पुढे चीन देशांतील प्रवाशांच्या प्रवासवर्णनांच्या लेखांतून, भारतातील त्या त्या पुढील घटनांचे, ऐतिहासिक कसोटीस, बव्हंशी उतरणारे, असे नेक उल्लेख सापडतात. ह्या आपल्या ऐतिहासिक कालातील ज्या सोनेरी पानांविषयी मी चर्चा करणार आहे तीच काय ती सोनेरी पाने म्हणून निवडण्यासाठी मी कोणती कसोटी वापरित आहे? तसे पाहता, आपल्या या ऐतिहासिक कालात, काव्य, संगीत, प्राबल्य, ऐश्वर्य, अध्यात्म प्रवृत्ती अवांतर कसोट्यांना उतरणारी शतावधी गौरवार्थ पाने सापडतात, परंतु कोणत्याही राष्ट्रावर पारतंत्र्यासारखे प्राणसंकट जेव्हा कोसळते, आक्रमक परशत्रूच्या प्रबळ टाचेखाली ते स्वराष्ट्र जेव्हा पिचून गेलेले असते किंवा जाऊ लागते, तेव्हा तेव्हा त्या प्रबळ शत्रूचा पाडाव करून नि पराक्रमाची पराकाष्ठा करून, स्वराष्ट्रास त्या पारतंत्र्यांतून सोडवणारी आणि आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचे, आणि स्वराज्याचे पुनर्जीवन करणारी जी झुंजार पिढी, तिच्या नि तिच्या नि तिला झुंजविणारे धुरंधर नि विजयी पुरूष त्यांच्या त्या स्वातंत्र्ययुध्दाच्या वृत्तांताचे जे पान, त्या पानास मी येथे सोनेरी पान म्हणून संबोधित आहे. कोणत्याही राष्ट्रात त्यांच्या अशा परंजयी स्वातंत्र्ययुध्दाची ऐतिहासिक पाने अशीच गौरविली जातात.
Release date
Audiobook: 11 December 2024
English
India