Step into an infinite world of stories
गीता जाणण्याची अनोखी संधी! मासानाम मार्गशीर्षो हम... असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. हा महिना म्हणजे गीता जाणून घेण्याचा महिना. या महिन्याच्या एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. गीतेविषयी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात " हे गीता नाम विख्यात/ सर्व वाङ्मयाचे मथित / आत्मा जेणे हस्तगत / रत्न होय // म्हणजे सर्व वाङ्मयांचे मंथन करून काढलेले लोणी म्हणजे गीता आहे. ही गीता जाणून घेण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे स्टोरी टेल वरील निरूपणकार पद्माकर देशपांडे यांच्या रसाळ शैलीतील स्वबोध गीता ऐकणे होय. स्वबोध गीता पर्व एक मध्ये गीतेचे पहिले सहा अध्याय ऐकायला मिळतात. गीतेवरील विविध भाष्यांचा अभ्यास करून हे निरूपण केले असल्याने तसेच त्यात गीतेव्यतिरिक्त अन्य काहीही नसल्याने ते मौलिक, श्रवणीय व आनंददायी झाले आहे. तर ऐकणार ना मग आज पासून स्टोरीटेल वरील 'स्वबोध गीता....'...
© 2025 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364389624
Release date
Audiobook: 8 January 2025
English
India