Step into an infinite world of stories
ग्रीसमध्ये इ.स.५० ते १३५ एपिक्टेटस नावाचा एक स्टॉईक (माणसानं तक्रार न करता वेदना सहन कराव्यात असं मानणारा ) तत्वज्ञ होऊन गेला. त्याने एक महत्वाची गोष्ट म्हणून ठेवली होती. ' माणसं कुठल्याही गोष्टींंमुळे अस्वस्थ होत नाहीत. तर त्या गोष्टींकडे ते कसे बघतात आणि त्याचा ते विचार करतात यामुळे ते अस्वस्थ होतात.' हे त्याचं वाक्य २००० वर्षांनंतर ' कॉग्निटिव्ह सायकोथेरपी' मध्ये खूप महत्वाचं ठरलं. अल्बर्ट एलिसवर एपिक्टेटसचेच विचार तो वेगळ्या शब्दांत मांडत होता. मानसोपचारात अविवेकी विचार बदलून त्यांना विवेकाने विचार केला तर त्याचा समस्यांकडे बघण्याची विचारांची पध्दत बदलते ही विवेकनिष्ठ मानसोपचार पध्दती आली. एलिसने वर्तमानावर आधारित रॅशनल इमोटिव्ह बिव्हेरियल थेरपी शोधली. जी सध्या जगभर अनेक मानसोपचार तज्ञ वापरतात.
Release date
Audiobook: 2 September 2022
English
India