Step into an infinite world of stories
पंढरपूरला जाणार्या पालखीबरोबर केलेला हा पायी प्रवास. सासवड ते पंढरपूर. दीडशेएक मैलांची वाटचाल. वारकर्यांसोबत केलेली. पालखीची आकडेवारी काढावी हे मूळ प्रयोजन; पण ते निमित्तमात्रच ठरून दि. बा. मोकाशींना मानवी जीवनाच्याच वारीचे घडलेले हे दर्शन! सांसारिक व्यथा-चिंतांची, काळजी-धास्तीची, असहिष्णुतेची ओझी वागवतच हे वारकरी या पालखीत सामील झाले आहेत. प्रांपचिक कटकटींना कंटाळून वारीला येणारे वारकरी यात आहेत तसेच वयव्याधी यांना न जुमानता नित्यनियमाने येणारेही आहेत. धावा, फुगडी, रिंगण या पालखीशी विजोड वाटणार्या प्रथांमध्ये रमलेल्या वारकर्यांबरोबरच, पालखीच्या वारीमध्ये वाटतेच देह ठेवण्याच्या निश्चयाने आलेले निष्ठावंत वारकरीही आहेत. कैकाडीबुवांच्या रसाळ नि झणझणीत कीर्तनाबरोबर कृष्णलीलांचे प्रयोग करणारे बुवाही या वारीत सामील आहेत. या पालखीत सोनोपंत दांडेकरांची धावती भेट होते. पंढरीच्या वाटेवरही ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे मिशनरी भेटतात. विठ्ठल व पैगंबर या दोनही दैवतांना मानणार्या जैतुनबाई या मुसलमान माळकरी स्त्रीचीही दिंडी या पालखीबरोबर आहे.
Release date
Audiobook: 17 December 2020
Tags
English
India