Step into an infinite world of stories
4.4
Personal Development
पैसा कमावण्यासाठी प्रयत्नांपासून दूर पळू नका, तर याविषयी जागृत व्हा. कामात दिरंगाई न करणारे आणि कोणतंही काम छोटं न समजणारे लोक कधीच बेरोजगार होत नाहीत. नवीन गोष्टी शिकण्यात रूची दाखवणारे आणि लोकांच्या ज्ञानाचा सन्मान करणारे लोक खऱ्या अर्थाने पैशाचा विनियोग कसा करावा, हे जाणतात. शिवाय, योग्य ठिकाणी बचत करतात आणि वायफळ खर्चही टाळतात. कारण अशा लोकांना पैशाचं हे सूत्र माहीत असतं :
पैशाची समस्या = निष्काळजीपणा + आळस + चुकीच्या सवयी - समज.
आपल्या सृजनात्मक विचारशक्तीच्या साहाय्याने लोकांना आवश्यक वाटणाऱ्या नवीन वस्तूंची निर्मिती करा. मग तुम्हाला कधीच पैशाची समस्या भेडसावणार नाही, पण यासाठी कंजुषी न करता गरजूंना दान करण्याची सवय अंगी बाळगा. कारण ही सर्व आहेत, समृद्धीची रहस्यं... तुम्हीही यांचा वापर करून तुमच्या जीवनात समृद्धी अनुभवा.
थांबलेला पैसा आणि साचलेलं पाणी एकसमान आहेत, अशा पाण्यातून दुर्गंधी येेऊ लागते.
Release date
Audiobook: 10 April 2022
Tags
English
India