Step into an infinite world of stories
साने गुरुजींच्या जन्मशताब्दि वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे निवडक साने गुरुजी. प्रा. रा. ग. जाधव यांनी संपादित केलेला विनम्र आदरांजली स्वरुपाचा असा हा ग्रंथ सानेगुरुजींवर प्रेम करणा-या त्यांच्या चाहत्यांना व तरुण जिज्ञासू वाचकांना देखील निश्चितच आवडेल. गुरुजींचे विविध प्रकारचे वाङ्मयीन अविष्कार कळावेत, जास्तीत जास्त अंगांनी हे दोन्ही भाग समजावेत आणि गुरुजींचा चरित्र-चरित्राची व वाङ्मायीन कामगिरीची एकमेकांत सहजपणे पडलेली रुचिर प्रतिबिंबेही लक्षात यावीत, असा प्रयत्न निवडीतून केला आहे. गुरुजींचे विपुल व विविध आणि प्रकाशित व अप्रकाशित लेखन, त्यांचा संक्षिप्त जीवनपटापासून त्यांचे कथा कादंबरी वाङ्मय, त्यांचे चरित्र वाङ्मय, कविता, पत्र वाङ्मय यांचाही समावेश यात आहे. अखंड वाचन, अभिजात पुस्तकांचे व अवघड परिस्थितीचे शी्घ्र सारग्रहण करणाची शक्ति या सर्वांचे शलाका-दर्शन प्रस्तुत संकलनातून घडेल.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9780430014419
Release date
Audiobook: 28 January 2018
English
India