Step into an infinite world of stories
दिग्विजयी, दानविक्रमी, अशरण सूर्यपुत्राची ही कहाणी.महारथी, महाबलशाली, महापराक्रमी व स्वयम इंद्राला दान देणाऱ्या दानशूर कर्णाची... ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पुस्तक शिवाजी सावंत यांच्या लेखणीतून साकार झालेली एक अजरामर कादंबरी 'मृत्युंजय'. मृत्युंजय चा अर्थ आहे ज्याने मृत्यूवर विजय प्राप्त केली आहे अथवा ज्याला मरण नाही, जो अमर आहे. अगदी नावाप्रमाणेच ही कादंबरी महाभारतातील अशा पात्रावर लिहिण्यात आली आहे जो वरवर तर खलनायक म्हणून भासायचा परंतु प्रत्येकक्षात तो सर्वात मोठा नायक होता. ज्याने आपली मैत्री व वचनाच्या रक्षणासाठी आपले प्राण ओवाळून टाकले, जो आयुष्यभर त्या कर्माची फळे भोगत राहिला जी त्याने कधी केलीच नव्हती. दानशूरपणा कशाला म्हणतात, संयम कसा असावा, मैत्री कशी जोपासावी व शक्तीची घमेंड कशी मोडावी हे सर्व शिकवणारी ही कादंबरी आहे. कर्ण त्याच्या परिवर्तनाच्या वाटेवर तो अमर झाला. त्याने स्वतःला सुतपुत्र मानले जेव्हा त्याला त्याची ओळख कळली तेव्हाही त्याने आपली ओळख सांगितली नाही, ज्याने स्वतःच्या गुरूचा शाप ही वरदान समजून घेतला. असा कर्ण ऐका,स्टोरीटेलवर.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356044074
Release date
Audiobook: 19 June 2022
English
India